श्री साईबाबा पालखी सोहळा समितीच्या वतीने गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त साईबाबा पालखी सोहळा आयोजित केला आहे आज दिनांक 17 जुलै शुक्रवार रोजी कसबा गणपती मंदिर येथून साई पालखीचे श्री शेत्र शिर्डी येथे प्रस्थान होणार आहे अशी माहिती समितीचे सचिव मंदार शहाणे यांनी दिली आहे प्रजापती ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्व महाविद्यालयाच्या संचालिका ब्रह्मकुमार नलिनी दीदी यांच्या हस्ते पालखी सोहळ्याला प्रारंभ होणार कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महापौर मंजुषा नागपुरे असणार आहे.याप्रसंगी शहाराच्या खासदार आमदार मान्यवर उपस्थित असणार आहे. पालखीचे श्री क्षेत्र शिर्डीकडे नगरमार्गी प्रस्थान होणार आहे. 27 जुलै रोजी पालखी शिर्डीला पोहचेल.
Views: 72









